Amravati: अमरावतीत राणा दांपत्याला पाहताच अनुयायांची घोषणाबाजी! | Viral Video | Dr. Ambedkar Jayanti
अमरावती शहरातील इर्विन चौकात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. यात अनेक राजकीय नेते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. काल (१४एप्रिल) रात्री अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हेदेखील अभिवादन करण्यासाठी आले होते. ते दिसताच काही अनुयायांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय